#PUNE : मुळशी तालुक्यातील 28 वर्षीय कुस्तीपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

10873 0

पुणे : मुळशी तालुक्यातील स्वप्निल पाडाळे या अवघ्या 28 वर्षीय कुस्तीपटूचा आज दुर्दैवी अंत झाला आहे. आज सकाळी व्यायाम करत असताना त्यास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्याच्यासोबत व्यायाम करणाऱ्या इतर मुलांनी त्यास रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याच डॉक्टरांनी घोषित केल आहे.

बालेवाडी येथे स्वप्निल हा मुलांना प्रशिक्षण देण्याचे काम करत होता. आज बुधवारी सकाळी सहा वाजता तो मुलांसोबत मैदानावर व्यायाम करत होता. जोर मारत असताना त्यास अचानक घाम येऊ लागला आणि तो बेशुद्ध झाला. त्यातच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचे जागीच निधन झाले.

महाराष्ट्र चॅम्पियनमध्ये स्वप्निलने तीन वेळा पदक प्राप्त केले होते. त्याचबरोबर खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेतही त्यानं चांगली कामगिरी करून पदक प्राप्त केले होते. तर नुकत्याच झालेल्या एनआयएस कुस्ती कोच परीक्षेत तो राज्यात प्रथम क्रमांकाने पास झाला होता.

अशा तरुण पहिलवानाच आज निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होते आहे.

Share This News
error: Content is protected !!