#BOLLYWOOD : ह्रितिक रोशन आणि सबा अडकणार विवाहबंधनात ? राकेश रोशन म्हणाले, हृतिक योग्य तो निर्णय घेईल !

786 0

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. आता हृतिक आणि सबा लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी या चर्चांवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

सुझान आणि हृतिक 14 वर्षांनी विभक्त

सबा सोबत रिलेशनमध्ये येण्याआधी हृतिक सुझान खानसोबत लग्नबंधनात अडकला होता. 2000 मध्ये हृतिक आणि सुझानचं लग्न झालं होतं. लग्नाला 14 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. विभक्त झाल्यानंतरही त्यांनी त्यांची मैत्री कायम ठेवली आहे. सुजैन सध्या अर्सलान गोनीसोबत रिलेशनमध्ये आहे.

राकेश रोशन (Rakesh Roshan) म्हणाले की, “हृतिक-सबाच्या लग्नाबद्दल मला काही माहिती नाही, मी ऐकलेलं नाही. सध्या त्यांच्यात फक्त मैत्रीचं नातं आहे. एकमेकांना समजून घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. लग्न हा भातुकलीचा खेळ नव्हे. लग्न म्हटल्यावर जबाबदारी देखील येते आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करुन हृतिक योग्य तो निर्णय घेईल”.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!