#PUNE CRIME : सिंहगड रोड पोलिसांनी सराईत वाहन चोराच्या आवळल्या मुसक्या; 8 मोटार सायकली जप्त

4551 0

पुणे : सिंहगडरोड पोलीस स्टेशनच्या हाद्दीत वाहन चोरीच्या अनुशंगाने तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार आबा उत्तेकर,शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, यांना याच्या खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एक इसम वडगाव ब्रिजचे खाली आलो असता धायरी फाटयाजवळ, एक इसम केसरी रंगाची यामाहा गाडी घेवुन थांबला असुन त्याने अंगात मरुन रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेली आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी तपास पथकाचे सपोनि सचिन निकम यांना कळविली असता त्यांनी सदरची बातमी वरिष्ठांना कळवुन वरिष्ठांनी योग्यती कारवाई करण्याचे आदेशित केले.

सदर माहिती ठिकाणी जावुन मिळालेल्या बातमीप्रमाणे खाञी केली असता बातमीत नमुद वर्णनाचा एक इसम धायरी फाटयाजवळ, केसरी रंगाची यामाहा गाडी घेवुन थांबलेला दिसला. बातमीप्रमाणे खात्री होताच त्यास आमची येण्याची चाहुल लागु न देता त्यास आहे त्या परिस्थितीत ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांने त्याचे नाव व पत्ता रोहन महेंद्र देवरकर वय-19 वर्षे रा.मुळ रा.कुभार निवास आकरा फाटा वडगाव निंबाळकर ता.बारामती जि पुणे सध्या रा.मानकर बिल्डींग प्लॅट नं 301 पोकळे नगर, सरडे बाग उत्तमनगर पुणे असे सांगितले.

त्यानंतर त्याचेकडे ताब्यात असलेल्या यमाहा मोटार सायकल गाडीचे कागदपत्र व लायसन्स बाबत विचारणा केली असता तो काही न बोलता इकडे तिकडे पाहुन उडवाउडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्याचा संशय आल्याने त्याचेकडे त्याचे ताब्यातील यमाहा मोटार सायकल बाबत अधिक तपास करता त्याने सदरची मोटार सायकल ही हॅप्पी कॉलनी, दागंट आळी, वडगाव पुणे येथुन चोरल्याचे सांगितले असता त्यास अटक करुन अधिक चौकशी करता त्याचेकडुन खालील गुन्ह्यामधील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

1)सिंहगडरोड पो स्टे गुन्हा रजि नं.114/2023 भा द वि कलम 379
2)सिंहगडरोड पो स्टे गुन्हा रजि.नं.115/2023 भा द वि कलम 379
3)सिंहगडरोड पो स्टे गुन्हा रजि.नं.03/2023 भा द वि कलम 379
4)वारजे माळवाडी पो स्टे गुन्हा रजि.नं.42/2023 भादवि कलम 379
5)उत्तमनगर पो स्टे गुन्हा रजि.नं.11/2023 भादवि कलम 379
6)उत्तमनगर पो स्टे गुन्हा रजि.न.24/2023 भादवि कलम 379
7)लोणीकाळभोर पो स्टे गुन्हा रजि.नं.652/2022 भादवि कलम 379
8)वडगाव पो स्टे गुन्हा रजि.नं.91/2023 भादवि कलम 379

असे एकुण 08 गुन्हे उघडकीस आणुन एकुण 8 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असुन पुढील तपास सपोनि सचिन निकम सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. रितेश कुमार साो, पोलीस आयुक्त साो, पुणे शहर मा. संदिप कर्णिक साो, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा.राजेंद्र डहाळे साो,पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर मा.सुहेल शर्मा साो, पोलीस उपआयुक्त परीमंडळ -3, श्री राजेंद्र गलांडे सोा, सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग श्री शैलेश संखे साो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री जयंत राजुरकर सोा, पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक श्री गणेश मोकाशी, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, अमित बोडरे, राजाभाऊ वेगरे, अमोल पाटील, सागर शेडगे, देवा चव्हाण, स्वप्नील मगर, अविनाश कोंडे, विकास बांदल, विकास पांडुळे यांचे पथकाने केली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!