#BOLLYWOOD : “आता आमच्या सोबत बेडरूममध्ये पण चला…!”; पापाराजींवर सैफ अली खान चिडला…

876 0

मुंबई : चित्रपट अभिनेता आणि अभिनेत्रींचे अनेक चाहते असतात. चित्रपटांमध्ये जे काम केले जाते त्या व्यतिरिक्त आपला आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री दिवसभरात काय करते , काय खाते ,त्यांचा दिनक्रम काय असतो, त्यांची आवड-निवड काय असते ,याच बरोबर त्यांच्या कुटुंबात कोण कोण आहे ? अशा एक ना अनेक प्रश्नांबाबत जाणून घेण्यासाठी चहाते उत्सुक असतात. आणि नेमकं हेच जाणून घेण्यासाठी त्यांच्या मागं पापाराजींचा ताफा धावत असतो. अनेक वेळा हे अभिनेता आणि अभिनेत्री यांना काही क्षण आपलं कामकाज थांबवून पोज देत असतात. पण अनेक वेळा ते भडकतातही.

आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आपण कुठे चाललो आहे ? काय करतो आहे ? हे कोणत्याही व्यक्तीला कसे आवडेल ? तेच नेमकं या पब्लिक फिगर बाबत होतं. यावेळी करीना कपूर आणि सैफ अली खान या बॉलिवूडच्या फेमस कपलला या पापाराजींनी घेरलं होतं. यावेळी नवाब सैफ अली खान या पापा राजींवर भडकलेला दिसून आलं. ” आता आमच्या बेडरूममध्ये पण या…!” असा खोचक टोला त्यानी या पापराजींना लगावला.

पण तरीही या पापाराजींना त्या दोघांचाही पाठलाग थांबवला नाही. शेवटी संताप होऊन सैफ अली खानने रूमचा दरवाजा बंद करून घेतला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होतो आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!