हवामान विभाग : 122 वर्षांचा विक्रम मोडला ! फेब्रुवारीतच सरासरी तापमान 29.5 डिग्री , सांभाळा !

758 0

महाराष्ट्र : महाराष्ट्र 2023 मध्ये फेब्रुवारी उलटत नाही तो पर्यंतच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मागच्या वर्षी थंडी देखील कडाक्याची पडली होती. तर जानेवारी आणि फेब्रुवारीच्या काही दिवसांपर्यंत थंडीचा कडाका जाणवत होता. आठवड्याभरापासून वातावरणामध्ये मोठे बदल होत आहेत.

दरम्यान येणारा उन्हाळा हा 122 वर्षांचा विक्रम मोडीत काढणारा ठरला आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये सरासरी 29.5 डिग्री तापमान नोंद करण्यात आले आहे. 1901 साला नंतर इतके तापमान पुन्हा नोंदवण्यात येते आहे.

यावर्षीचा उन्हाळा चांगलाच त्रासदायक ठरू शकणार आहे. राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून मार्च ते मे महिन्यादरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!