उज्जैन : उज्जैनमध्ये एक विक्षिप्त घटना समोर आली आहे. एका शीघ्रकोपी पतीने कामावरून आल्यानंतर पत्नीने न आवडती भाजी ताटात वाढली म्हणून केवळ तिला मारहाणच नाही केली तर स्वतःच घर पेटवून दिले. या घटनेमध्ये घरातील सर्व वस्तू जळून खाक झाले आहेत. यातून सुमारे दहा लाखाचं नुकसान झालं आहे.
संतापाच्या भरात पतीने हे असं कृत्य केलं असलं तरी संताप शांत झाल्यानंतर स्वतःच्याच कपाळावर थाप मारून घेण्याची वेळ या पतीवर नक्कीच आली आहे. कामावरून परत आल्यानंतर पत्नीने भाजी ऐवजी ताटात डाळ वाढली म्हणून या शीघ्रकोपी पतीने पत्नीला थेट मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर घरामध्ये केरोसीन टाकून स्वतःचाच घर पेटवून दिल.
त्यानंतर या पतीने पळ काढला आहे. या घटनेबद्दल महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पती तिला नेहमीच मारहाण करत असे, याआधी त्याने अशीच संतापून खिडकीची काच देखील फोडली होती. दरम्यान या विकृत मनोवृत्तीच्या पतीच्या विरोधात कलम 323, 504 आणि 436 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.