पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यात 24 वर्षीय जवानाची आत्महत्या

438 0

पुणे- पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून भारतीय सैन्य दलातील एका 24 वर्षीय जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गोरख नानाभाऊ शेलार असे या जवानाचे नाव आहे. गोरख हे सैन्य दलामध्ये भरती नर्सिंग असिस्टंट पदावर एएफएमसीमध्ये कार्यरत होते. पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून त्यांनी 6 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री गळफास घेत आत्महत्या केली आहे. या प्रकरणी गोरख शेलार यांचे भाऊ केशव यांनी वानवडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

गोरख शेलार यांच्या आत्महत्या प्रकरणी पत्नी अश्विनी पाटील, युवराज पाटील, संगीता पाटील, योगेश पाटील, भाग्यश्री पाटील (सर्व रा. नंदुरबार) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरख शेलार यांचे भाऊ केशव यांनी आपल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, 16 फेब्रुवारी 2021 रोजी माझ्या भावाचं लग्न झालं होतं. लग्न झाल्यापासून माझ्या भावाची पत्नी अश्विनी युवराज पाटील हिने 6 फेब्रुवारी 2022 पर्यंत माझा भाऊ गोरख शेलार याला वारंवार मानसिक त्रास दिला. तुझी नोकरी घालवतो, गरोदर पत्नीचा गर्भपात करतो आणि तुझ्यासह तुझ्या कुटुंबावर गुन्हा दाखल करतो. नाहीतर सोडचिठ्ठी दे आणि 15 लाख रुपये दे असे वारंवार बोलून माझा भाऊ गोरख शेलार याला वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास दिला.

Share This News
error: Content is protected !!