पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यात 24 वर्षीय जवानाची आत्महत्या

348 0

पुणे- पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून भारतीय सैन्य दलातील एका 24 वर्षीय जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गोरख नानाभाऊ शेलार असे या जवानाचे नाव आहे. गोरख हे सैन्य दलामध्ये भरती नर्सिंग असिस्टंट पदावर एएफएमसीमध्ये कार्यरत होते. पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून त्यांनी 6 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री गळफास घेत आत्महत्या केली आहे. या प्रकरणी गोरख शेलार यांचे भाऊ केशव यांनी वानवडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

गोरख शेलार यांच्या आत्महत्या प्रकरणी पत्नी अश्विनी पाटील, युवराज पाटील, संगीता पाटील, योगेश पाटील, भाग्यश्री पाटील (सर्व रा. नंदुरबार) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरख शेलार यांचे भाऊ केशव यांनी आपल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, 16 फेब्रुवारी 2021 रोजी माझ्या भावाचं लग्न झालं होतं. लग्न झाल्यापासून माझ्या भावाची पत्नी अश्विनी युवराज पाटील हिने 6 फेब्रुवारी 2022 पर्यंत माझा भाऊ गोरख शेलार याला वारंवार मानसिक त्रास दिला. तुझी नोकरी घालवतो, गरोदर पत्नीचा गर्भपात करतो आणि तुझ्यासह तुझ्या कुटुंबावर गुन्हा दाखल करतो. नाहीतर सोडचिठ्ठी दे आणि 15 लाख रुपये दे असे वारंवार बोलून माझा भाऊ गोरख शेलार याला वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास दिला.

Share This News

Related Post

गणपती विसर्जनाच्या सायंकाळी व्यापाऱ्यांनी आपल्या दुकाना बाहेरील दिवे रात्रभर सुरू ठेवावेत – फत्तेचंद रांका

Posted by - September 8, 2022 0
पुणे : गणेश विसर्जनासाठी संपूर्ण पुणे शहर सज्ज झाल आहे. श्री गणेशाचा विसर्जन सोहळा देखील भक्तिमय वातावरणात आणि कायदा सुव्यवस्थेला…

सावरकरांविरोधी वक्तव्यामुळे हिंदू महासंघ आक्रमक; राहुल गांधींनी त्यांच्या आजीने सावरकरांना लिहिलेलं हे पत्र वाचलं नव्हतं का?

Posted by - November 17, 2022 0
पुणे : राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून सध्या महाराष्ट्रात चांगलाच वाद पेटलाय. वीर सावरकर हे इंग्रजांची पेंशन…
Dhangar Reservation

Dhangar Reservation : 21 व्या दिवशी चौंडीतील धनगर समाजाचं उपोषण मागे

Posted by - September 26, 2023 0
अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी (Dhangar Reservation) यशवंत सेनेने सुरू केलेलं उपोषण 21 व्या दिवशी मागे घेण्यात आलं…

Breaking News ‘इलेक्शन मध्ये उभे राहू नको नाहीतर…..’ माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना धमकी

Posted by - April 5, 2023 0
‘इलेक्शन मध्ये उभे राहण्याच्या भानगडीत पडू नको, अन्यथा गोळ्या घालून ठार मारू’ अशी धमकी काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना…

Chandrakant Patil : राज्यातील तरुणांना जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीवर संशोधन आणि सामाजिक कार्याची संधी

Posted by - November 14, 2022 0
मुंबई : जलसंधारण तसेच पर्यावरण पूरक जीवनशैली यावर संशोधन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी युनिसेफ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *