BIG BREAKING : पहाटेच्या शपथविधी बाबत शरद पवारांचा गौप्यस्फोट ; … त्यामुळें राष्ट्रपती राजवट उठली ! वाचा काय म्हणाले शरद पवार

546 0

पुणे : आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठा गौप्य स्फोट केला आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ” पहाटेच्या शपथविधीचा फायदा एकच झाला की राष्ट्रपती राजवट होती ती उठली, आणि राष्ट्रपती राजवट उठल्यानंतर काय झालं हे तुम्ही पाहिलंच असेल… राष्ट्रपती राजवट कुठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का ?

पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का ? उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असा सवाल करत पहाटेचा शपथविधी ही राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीची खेळी होती असा धक्कादायक खुलासा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला आहे.

 

Share This News
error: Content is protected !!