#तू झूठी में मक्कार : रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचं नवं गाणं ‘शो मी द थुमका’ रिलीज VIDEO SONG

820 0
मनोरंजन : रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या आगामी ‘तू झूठी मैं मक्कार‘ या चित्रपटातील ‘शो मी द ठुमका’ हे नवे गाणे रिलीज झाले आहे. हे तेच गाणे आहे ज्याची झलक ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली होती. हे गाणे निर्मात्यांनी काही वेळापूर्वीच रिलीज केले आहे.
साडेतीन मिनिटांच्या या गाण्यात रणबीरचा डान्स पाहिल्यानंतर तुम्हाला एकदा ‘ये जवानी है दिवानी’ नक्कीच आठवेल. तर दुसरीकडे श्रद्धा हिंदी आपल्या पातळ कमरेने सर्वांना वेड लावताना दिसत आहे. पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली श्रद्धा जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हे गाणं सुनिधी चौहान आणि शाश्वत सिंह यांनी गायलं आहे. या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांचे आहेत.
लव रंजन दिग्दर्शित या चित्रपटाची अनोखी जोडी आणि त्यांची अनोखी प्रेमकहाणी मोठ्या पडद्यावर काहीतरी वेगळं सिद्ध होईल, असं मानलं जात आहे. या चित्रपटात रणबीर कपूर पहिल्यांदाच अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणीदेखील प्रेक्षकांना खूप आवडत आहेत.
Share This News
error: Content is protected !!