निमित्त शिवजयंतीचे आणि बॅनरवर संभाजी महाराजांचा फोटो, सारथीचा अजब कारभार

558 0

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांच्या 392 जयंती निमित्त सारथी संस्थेतर्फे ऑनलाईन वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या बॅनरवर करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐवजी संभाजी महाराजांचा फोटो छापण्याचा प्रताप सारथी संस्थेने केला आहे. या प्रकारचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे.

शिवजयंती’ संदर्भात सारथी संस्थेने आपल्या अधिकृत वेबसाईटवर सदर वक्तृत्व स्पर्धेचे बॕनर प्रसिद्ध केले आहे. या बॅनरवर नजरचुकीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐवजी संभाजी महाराजांचा फोटो छापण्यात आला आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या नावे असणाऱ्या राज्य सरकारच्या अधिकृत संस्थेकडून अशी चूक होणे योग्य नाही असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले आहे. हा प्रकार अत्यंत अत्यंत चुकीचा आणि संतापजनक आहे असं शिंदे यांनी म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!