#CRIME : मंत्र तंत्र म्हणून हातावर कापूर जाळायचा आणि पीडित विद्यार्थ्याला ‘तांत्रिक शरीरसंबंध’ करायला भाग पाडायचा; मुंबईतील उच्चशिक्षित दांपत्याचा विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार

788 0

मुंबई : मुंबईतील आयआयटीच्या एका विद्यार्थ्यासोबत एक भयानक प्रकार घडला आह. एका समलैंगिक ॲपच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर उच्चशिक्षित दांपत्याने या तरुणाचे शारीरिक शोषण केले आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, एका समलैंगिक ॲपच्या माध्यमातून मुंबईतील आयआयटीच्या विद्यार्थ्यांशी ओळख करण्यात आली. त्यानंतर या विद्यार्थ्यावर अनैसर्गिक पद्धतीने लैंगिक अत्याचार करण्यात आला.

शुब्रो बॅनर्जी आणि मनुष्री या उच्चशिक्षित दांपत्याने या विद्यार्थ्याला मारहाण केली तसेच त्याच्यावर अमानुषपणे अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्यावर वसतिगृहातील खोलीमध्ये आणि घरी शुब्रो यानी अत्याचार केला असल्याचे समजते. तसेच देवीचा प्रसाद विद्यार्थ्याला खायला दिला त्याला अंगारा लावून जप,मंत्र, तंत्र आणि टॅरो कार्डचा वापर करून त्याला संमोहित केले गेले. तसेच विद्यार्थ्याला शारीरिक अत्याचाराचा बळी देखील व्हावे लागले आहे.

यामध्ये या विद्यार्थ्याला गळ्यात दोरे बांधणे, मिळबत्तीचे चटके देणे असे विक्षिप्त प्रकार करण्यात आले. या विद्यार्थ्याला लैंगिक गुलाम बनवण्यात आले होते. तसेच त्याची सर्व कागदपत्र आणि पासपोर्ट देखील जप्त करून घेण्यात आला होता. शुभ्रो हा आरोपी जप, मंत्र, तंत्र म्हणून हातावर कापूर जाळून या विद्यार्थ्याला तांत्रिक सेक्स करायला भाग पाडायचा… संमोहनाद्वारे तरुणाला बेशुद्ध करून अंगावर मेणबत्तीचे गरम थेंब टाकायचा, तसेच दुधामध्ये गुंगीचे औषध मिसळून विद्यार्थ्यांच्या काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करून तीन फॉर्म भरून घेतल्याचे देखील समजते आहे.

या सर्व विक्षिप्त कृत्यांमध्ये आरोपीची पत्नी देखील सहभागी होती. याप्रकरणी पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कायदा माहिती व तंत्रज्ञान जादूटोणा कायद्यासह अनैसर्गिक अत्याचार, हत्येचा प्रयत्न यानुसार या दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Share This News
error: Content is protected !!