Breaking News

“जेव्हा कोणी घरात नसते तेव्हा आजोबा गोदीत बसवत आणि…” आजोबांचा ११ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार, असे समजले पालकांना

1521 0

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खरंतर आई बाबांच्या व्यतिरिक्त घरातील आजी आजोबा , काका काकू , मामा मामी हे जवळचे नातेवाईक मुलांसाठी सुरक्षित आहेत असे आपण मुलांना शिकवत असतो. पण नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. ११ वर्षाच्या चिमुकलीवर तिच्या आजोबांनीच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस अली आहे.

शाळेमध्ये गुड टच – बॅड टच शिकवत असताना या चिमुकलीने, ” जेव्हा कोणी घरात नसते तेव्हा आजोबा गोदीत बसवत आणि…” हे शिक्षकांना सांगितले आणि त्यांना धक्काच बसला. एवढेच नाही तर आजोबा अश्लील व्हिडिओ देखील दाखवत आणि ते दाखवल्यावर मी ओरडले तर आजोबा तोंड दाबायचे हे देखील तिने शिक्षकांना सांगितले.

हि घटना समजल्यानंतर घरच्यांना नक्कीच धक्का बसला असणार. या घटनेने मुलं बाहेरचं नाही तर घरात देखील सुरक्षित नाहीत हे समजते. मुलांना शाळेत गुड टच बॅड टच शिकवणे आणि आई वडिलांनी मुलांना योग्य वयात माहिती देणे आवश्यक आहे.

Share This News
error: Content is protected !!