महत्त्वाची बातमी : तुमचे ट्विटर अकाउंट हॅक तर झाले नाही ना ? 200 दशलक्ष होऊन अधिक ट्विटर युजरचा ईमेल आयडी चोरीला, सिक्युरिटी रिसर्चच्या रिपोर्ट नुसार…

775 0

महत्त्वाची बातमी : सिक्युरिटी रिसर्च रिपोर्टच्या दाव्यानुसार 200 दशलक्ष हून अधिक ट्विटर युजरचा ई-मेल आयडी चोरीला गेला आहे. ही एक महत्त्वाची बातमी आहे. हॅकर युजर्सचे ईमेल आयडी चोरून ते एका ऑनलाइन फॉर्म मध्ये पोस्ट केले आहेत.

ट्विटर न मात्र याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. या आधी ट्विटर वरील डेटा चोरीला गेल्याची घटना घडलेली आहे. जानेवारी 2022 मध्ये सुमारे 54 लाख युजर्सचा डेटा चोरीला गेला असल्याचे ट्विटर कंपनीने सांगितलं होतं.

या हॅकिंग संदर्भात ह्याव आय बीन पॉन्ड या ब्रिज नोटिफिकेशन साईटचे निर्माते ट्राय हंट यांनीही या रिपोर्टच्या दाव्यावर सहमती दर्शवली आहे. ते म्हणाले की हा दावा खरा असून रिपोर्ट मध्ये जे सांगण्यात आलं आहे ते खरं आहे. हॅकर्सने ऑनलाइन फॉर्मवर युजरच्या आयडीचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या स्क्रीन शॉट मध्ये त्यांची ओळख आणि ठिकाण याचा उल्लेख नसून काहींच्या मते हा डेटा 2021 च्या सुरुवातीच्या काळातच चोरीला गेल्याचे म्हटलं जात आहे.

Share This News
error: Content is protected !!