Murder Mystery : अपहरण करून खून झालेल्या ‘त्या’ वकिलाचे मारेकरी सापडले

476 0

पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयातून अपहरण करून खून झालेल्या पिंपरी-चिंचवडमधील ‘त्या’ वकिलाच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात आली. 31 डिसेंबर रोजी काळेवाडीतील उच्च न्यायालयाचे वकील शिवशंकर शिंदे यांचं अपहरण करून खून करण्यात आला होता.

वकील शिवशंकर शिंदे यांचं अपहरण करून त्यांचा खून केल्याप्रकरणी फरार असलेल्या राजेश्वर गणपत जाधव, सतीश माणिकराव इंगळे आणि बालाजी मारुती एलनवर या तीन आरोपींना अटक करण्यात पिंपरी-चिंचवडच्या गुंडाविरोधी पोलिस पथकाला अखेर यश आलं. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, यातील मुख्य आरोपी राजेश्वर जाधव याच्या घटस्फोटाच्या प्रकरणाचं कामकाज वकील शिवशंकर शिंदे पाहात होते.

दरम्यानच्या काळात आपल्या पत्नीचे वकील शिवशंकर शिंदे यांच्याशी विवाहबाह्य अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय राजेश्वर जाधव याला आला आणि त्यातूनच त्यांनी 31 डिसेंबरच्या संध्याकाळी वकील शिवशंकर शिंदे यांचं त्यांच्या काळेवाडी येथील ऑफिसमधून एका टेम्पोतून अपहरण केलं आणि खून केला. त्यानंतर तेलंगणा राज्यातील कामारेड्डी जिल्ह्यातील चिन्नमा कोरी मंदिराजवळ त्यांचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट केला, असं पोलीस तपासात निष्पन्न झालं. वाकड पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!