Breaking News

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! पुण्यात रंगणार भारत-श्रीलंका ट्वेन्टी 20 सामना

462 0

पुणे : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात पुढील वर्षी 5 जानेवारीला गहूंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ट्वेन्टी 20 क्रिकेट सामना रंगणार आहे. भारत – श्रीलंका यांच्यामध्ये तीन ट्वेन्टी 20 क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातला दुसरा सामना 5 जानेवारीला पुण्यात दिवस रात्र रंगणार आहे.

एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित होत असलेला हा चौथा आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी 20 सामना तर तेरावा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना ठरणार आहे. एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत दोन आंतरराष्ट्रीय कसोटी, 7 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि 3 आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी 20 तसेच आयपीएलचे 51 सामने झाले आहेत. 2016 मध्ये झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी 20 सामन्यात श्रीलंका संघाने भारतीय संघाचा पाच गडी राखून पराभव केला होता. 2020 मध्ये झालेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी 20 सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका संघाचा 78 धावांनी पराभव केला होता.

5 जानेवारीला क्रिकेटप्रेमींना भारत- श्रीलंका ट्वेन्टी 20 सामन्याचा आनंद घेता येणार आहे. सामन्याच्या तिकीट विक्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. पीवायसी हिंदू जिमखाना आणि गहूंजे येथील मैदानावर सकाळी 10 ते 6 या वेळेत तिकीटं उपलब्ध असतील.

Share This News
error: Content is protected !!