Breaking News

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारणी अध्यक्षपदी सतीश काळे

239 0

पिंपरी- मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहराची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी सतीश काळे यांची निवड करण्यात आली आहे.

चिंचवड येथे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पिपंरी चिंचवड शहर कार्यकारणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय कार्यकारणी सदस्य संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक रमेश हांडे, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते, मावळ तालुका अध्यक्ष आदिनाथ मालपोटे उपस्थित होते.

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पिपंरी चिंचवड शहर कार्यकारणी पुढीलप्रमाणे-

अध्यक्ष- सतीश काळे, कार्याध्यक्ष- ज्ञानदेव लोभे, संजय जाधव, सचिव- श्रीमंगेश चव्हाण, उपाध्यक्ष- नितीन जाधव, सतीश कदम, महेश कांबळे, सुभाष जाधव, संघटक- राजेंद्र चव्हाण, संतोष सूर्यवंशी, बाळासाहेब वाघमारे, विनोद घोडके, गजानन वाघमोडे

प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहर संघटन पुनर्बांधणीची प्रक्रिया जोमाने सुरू करून शहराचे नवनिर्वाचित महानगर अध्यक्ष सतीश काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन कार्यकारणी गठित करण्यात आली.

यावेळी बोलताना सतीश काळे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षापासून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये संभाजी ब्रिगेडचे सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. अनेक शैक्षणिक, सामाजिक, क्षेत्रासाठी समाजोपयोगी काम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून शहरामध्ये होत आहे. तसेच संभाजी ब्रिगेडने कामगारांचे हित आणि शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केलेली आहेत ” यापुढे संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रत्येक विभागात शाखा निर्माण करणार असे आश्वासन सतीश काळे यांनी दिले.

यावेळी प्रदेश संघटक रमेश हांडे म्हणाले की, संभाजी ब्रिगेड नवी दिशा नवा विचार घेऊन आता मैदानात उतरली आहे. देशात नव्हे तर जगात मराठा ही बिझनेस कम्युनिटी म्हणून ओळखली जावी. यापुढे तरुणांनी उद्योग-व्यवसाययातून आपली प्रगती साधावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे आयोजन सतीश काळे यांनी केले होते तसेच या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने वैभव जाधव, रशीद सय्यद,भैय्यासाहेब गजधने,जयेश दाभाडे आदींनी परिश्रम घेतले.

Share This News
error: Content is protected !!