MARATHI RECIPE : पौष्टिक ‘मेथीचे पराठे’ बनवण्याची सोपी पद्धत

436 0

साहित्य : 2 कप गव्हाचे पीठ, 1 कप मेथी (150-200 ग्राम), ४-५ बारीक चिरलेला लसूण, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, तेल, मीठ चवीनुसार, पराठा बेक करण्यासाठी 3-4 चमचे तेल किंवा तूप. 

कृती : मेथीची पाने निवडून स्वछ धुऊन घ्या. त्यानंतर बारीक चिरून घ्या. एका बाउलमध्ये 2 कप कणिक घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेली मेथी , लसूण पेस्ट , बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ घालून चांगली मळून घ्या. १० मिनिटं झाकून ठेवा.

या कणकेचे बारीक गोळे करून परोठा लाटून घ्या. आणि छान भाजून दही किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा.

Share This News
error: Content is protected !!