सध्या लग्नसराई सुरू आहे. जे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत, त्यांना एक अनामिक भीती वाटत असते. ज्यांची लग्न झाली आहेत. मग अगदी प्रेमविवाह का असेना, त्यांनी देखील ही अनामिक भीती अनुभवली असेल. ही भीती नेमकी काय असते ? हे देखील बोलता येत नाही. त्यामुळे नववधू आणि नवरदेव स्वतःच्याच लग्नामध्ये कुठेतरी विचारमग्न वाटतात. चला तर मग तुम्हाला काही अशा टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमची ही अनामिक भीती दूर होईल.
1. प्रेमविवाह असो किंवा कुटुंबाने ठरवलेले लग्न… तुम्ही आता कोणाचे तरी कायमचे होणार आहात त्यामुळे ज्या व्यक्तीसोबत तुम्ही पुढे आयुष्य घालवणार आहात त्याला त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही बाजूंनी स्वीकार करा.
2. तुमच्या जोडीदाराशी अधिकाधिक बोला. काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्ही केवळ स्वतःशीच बोलता. काही गोष्टी अशाही असतात की ज्या तुम्ही स्वतःशी बोलणं देखील टाळता. ती गोष्ट एकदा तरी होणाऱ्या जोडीदाराशी बोला… मन मोकळ करा, बरं वाटेल !
3. अनेकांना शरीर संबंध याविषयी देखील भीती वाटत असते. विशेष करून ही भीती महिलांना जास्त वाटते. यासाठी लग्न झालेल्या एखाद्या मैत्रिणीची मदत घ्या . मुलांनी लग्न झालेल्या मित्राशी संवाद साधा.
4. सामान्यतः लग्नाच्या आधी सर्वच मुली आणि मुलं उशिरा उठणे, निवांत आवरणे, घरातील मोठी काम न करणे, फक्त स्वतःचे आवरणे आणि नोकरी व्यवसाय याकडेच लक्ष देणे, हे करत असतात. लग्नानंतर एकमेकांची जबाबदारी आणि कुटुंबाची जबाबदारी देखील कमी जास्त प्रमाणात तुमच्या खांद्यावर येणार आहे. याचे दडपण घेण्याची आवश्यकता नाही. थेट बोला ! तुमच्या सवयी सांगा आणि थोडं बदला देखील आयुष्यात बदल होणार आहेत. पण त्याचे दडपण घेण्याची आवश्यकता नाही.
५. आई वडील आणि कुटुंबापासून लांब जाण्याची भावना नववधूसाठी त्रासदायक ठरते. लग्न ठरणे ते लग्न होऊन सासरी जाण्यापर्यंत मनामधलं हे हुरहुर पाठवण्याच्या वेळी फुटते. अश्रू थांबवू नका. पण हे लक्षात घ्या की, आता जग खूप जवळ आलं आहे. आणि लोकांची मानसिकता देखील त्यामुळे जेव्हा तुम्हाला आई-वडिलांची आठवण येते. तेव्हा तुम्ही फोनवर बोलणे किंवा थेट जाऊन भेटणे हे अगदी सहज करू शकता हे मनाला सांगा.
६. तुम्ही जाड असाल, अगदी बारीक असाल, एखादा आजार असेल, सावळे असाल,तुम्हाला टक्कल असेल… मुला-मुलींना आपल्या चुकीच्या बाजूकडेच अशावेळी अधिक लक्ष दिले जाते. आणि त्यामुळे देखील दडपण येते. पण लग्न ठरले आहे. म्हणजे आपल्या जोडीदाराने आपल्याला मनापासून आहेत असे स्वीकारले आहे. हे लक्षात घ्या, तुम्ही परफेक्ट असलेच पाहिजे असे नाही, हो त्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता!