मुंबई: महापुरुषांच्या आव्हानाच्या निषेधार्थ आज मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीने महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून क्रुडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे या मोर्चाचे नेतृत्व उद्धव ठाकरे अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार हे साडेबारा वाजता सभेस्थळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते सभेला संबोधित करणार आहेत. दरम्यान, महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कोणतीही भूमिका न घेतल्यानं शरद पवारांनी खंत व्यक्त केली. राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं याबाबत जी काळजी घ्यायला हवी होती ती काळजी घेतली नाही. त्यांची केवळ बघ्याची भूमिका आहे. त्यामुळं लोकांमध्ये संताप असल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.