पुणे : पिंपरीमध्ये आज एका कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. महापुरुषांविषयी केलेल्या अपमानकारक वक्तव्याचा निषेध म्हणून समता परिषदेच्या कार्यकर्त्याने शाई फेकली आहे. यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवाडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेवर पुणे शहराचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
ते म्हणले कि , जिल्ह्याचे पालकमंत्री भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमच्या सर्वांचे नेते नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा महाभकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या सर्व घटक पक्षांच्या आणि कार्यकर्त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचा निदर्शक आहे. दिलगिरी व्यक्त केल्यानंतर सुद्धा हा हल्ला करणं म्हणजे अतिशय भ्याड नव्हे तर निंदनीय कृत्य आहे. त्याचा करावा तेवढा निषेध थोडा आहे. पण मी या ठिकाणी एक नक्की सांगतो, भारतीय जनता पक्षाची ही संस्कृती नाही. भारतीय जनता पक्ष हा कायम लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणारा, प्रत्युत्तर देणारा पक्ष आहे. पण याचा अर्थ आम्ही हातात बांगड्या भरल्या असं नाही. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर जर विनाकारण सातत्याने अशा प्रकारचे हल्ले झाले. विनाकारण शब्दाचा काहीतरी गैरअर्थ काढून काहीतरी निरर्थक वाद उत्पन्न केले गेले, तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता गप्प बसणारा नाही.
ज्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच कृत्य केले आहे. जे कार्यकर्ते नेत्यांबद्दल घाण बोलतात, गलिच्छ बोलतात. अशा सर्वांना सांगू इच्छितो कि, गाठ भारतीय जनता पक्षाशी आहे. आज पर्यंत आम्ही सहन केल. पण आता बास…! यापुढे तर एक कृत्य तुमच्याकडून गैर घडला तर जशास तस उत्तर द्यायला आमचा कार्यकर्ता समर्थ आहे. अशा शब्दात भाजपा पुणे शहराचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.