‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ विरोधात पुणे RTO ची आजपासून विशेष मोहीम

367 0

पुणे : पुणे शहरात बेकायदा रॅपिडो बाईक टॅक्सीवर आता धडक कारवाई करण्यात येणार असून, त्यासाठी ‘आरटीओ’कडून 12 मोटार वाहन निरीक्षकांची या कारवाईसाठी नेमणूक करण्यात आली आहे.

आजपासून या विशेष मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. RTO कार्यालयासमोर रिक्षाचालकांनी सोमवारी तीव्र स्वरूपाचे चक्का जाम आंदोलन केल्यानंतर ‘आरटीओ’कडून आता बेकायदा प्रवासी वाहतूक करणार्‍या बाईक टॅक्सीविरोधात कारवाई करण्याकरिता विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत 640 गाड्यांवर कारवाई करुन 45 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी दिली.

Share This News
error: Content is protected !!