Breaking News

PMPML बसमधे आगीची घटना; वेळेत आगीवर नियंत्रण, मोठी हानी टळली

386 0

पुणे : आज दिनांक २५•११•२०२२ रोजी दुपारी १२•०४ वाजता अप्पर डेपो बसस्थानक येथे बसला आग लागल्याची वर्दि प्राप्त होताच गंगाधाम अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी बसच्या पुढील बाजूस इंजिनच्या ठिकाणी पेट घेतल्याचे निदर्शनास येताच आगीवर पाण्याचा मारा करुन आग पुर्ण विझवली व धोका टाळला. सदर बस ही अप्पर डेपो ते स्वारगेट या मार्गाची असून बसचालक विश्वास किलजे यांनी प्राथमिक स्तरावर प्रसंगवधान राखत तिथे बसस्थानकावर उपलब्ध असलेले दोन अग्निरोधक उपकरण वापरुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. बसमधे कोणीही प्रवासी नव्हते. या घटनेत कोणीही जखमी नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

या कामगिरीत गंगाधाम अग्निशमन केंद्र अग्निशमन अधिकारी सुनिल नाईकनवरे, वाहनचालक निलेश कदम व जवान जितेंद्र कुंभार, आदिनाथ मोहिते यांनी सहभाग घेतला.

Share This News
error: Content is protected !!