चिंताजनक : ट्विटर आणि ॲमेझॉननंतर आता गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट देणार १०,००० कर्मचाऱ्यांना नारळ

432 0

गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटा ही लवकरच दहा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याची माहिती समोर येते आहे. तथापि कंपनीने अद्याप कर्मचारी कपातीबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

द इन्फॉर्मेशनने दिलेल्या माहितीनुसार गुगल परफॉर्मन्स इम्प्रूमेंट आणि रँकिंग प्लॅन योजना लागू करून सुमारे दहा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखत आहेत. नवीन प्रणाली अंतर्गत कंपनी सहा टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असून जे कर्मचारी कामात कमी पडत आहेत, अशा कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!