‘लेडी डॉन थेरगाव क्वीन’च्या विरोधात गुन्हा, पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई (व्हिडिओ)

759 0

पिंपरी- सोशल मीडियावर अश्लील भाषेत शिवीगाळ करून सर्वसामान्य नागरिकांना धमकावणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या लेडी डॉन थेरगाव क्वीन आणि तिच्या दोन साथीदारांच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

स्वतःला थेरगाव क्वीन म्हणवणाऱ्या तरुणीचे नाव आहे साक्षी हेमंत श्रीश्रीमहाले. तिच्यासोबत कुणाल कांबळे आणि रमेश कश्यप यांच्या विरोधात वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सहकारी कुणाल कांबळे आणि रमेश कश्यप ह्यांच्या मदतीने सोशल मीडियावर थेरगाव क्वीन नावाने अकाउंट चालवत होती. या अकाऊंटच्या माध्यमातून लोकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकावण्याचे काम हे त्रिकुट करत होतं. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे थेरगाव परिसरामध्ये लेडी डॉनची मोठी दहशत निर्माण झाली होती.

वाकड पोलिसांनी तिच्या आणि तिच्या दोन साथीदारांच्या विरोधात आयटीआय ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. आणि चांगली समज देखील दिलीये. यापूर्वी पिंपरी चिंचवड पोलिसांनी या थेरगाव क्वीनचं समुपदेशन केलं. मात्र तिच्यात सुधारणा न झाल्याने तिच्या विरोधात कारवाई केली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!