शंभर पेक्षा जास्त जागा जिंकू, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना विश्वास

98 0

पुणे- भाजपची पुणे शहरातील संघटनात्मक बांधणी, गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या माध्यमातून केलेला नियोजनबध्द विकास, पुणेकरांचा दृढविश्वास आणि सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरील जनतेचा रोष यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या 100 हून अधिक जागा निवडून येतील असा विश्वास शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला. महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध झाल्यावर मुळीक पत्रकारांशी बोलत होते.

मुळीक म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत कलह असल्याने आराखडा प्रसिद्ध होण्यास विलंब झाला. आराखडा तयार करताना त्यांच्यात एकवाक्यता नव्हती. प्रभागांची तोडफोड करून नवीन रचना करण्यात आली. आत्मविश्वास गमावलेल्या महाविकास आघाडीवर भाजप सहज विजय संपादन करू शकेल असा विश्वास वाटतो”

मेट्रो, समान पाणीपुरवठा, भामा आसखेड प्रकल्प, पीएमपीच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात बसेसची खरेदी, नदी शुध्दीकरण योजनेला गती, अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, कोरोना काळात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे काम, सेवा कार्य आणि प्रभाग स्तरावर नगरसेवकांनी केलेली विकासकामे या जोरावर आम्ही पुन्हा एकदा पुणेकरांच्या विश्वासाला पात्र ठरू असं मुळीक म्हणाले.

Share This News

Related Post

#VIRAL VIDEO : सेल्फी घेण्यासाठी ठाकरे गटाच्या आमदार पुत्राची सोनू निगमला धक्काबुक्की; गुन्हा दाखल, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Posted by - February 21, 2023 0
चेंबूर : सोमवारी चेंबूरमध्ये ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातरपेकर यांच्या वतीने एका फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. या फेस्टिवलमध्ये गायक…

टीईटी घोटाळ्यातील आरोपी तुकाराम सुपे याची जामीनावर सुटका

Posted by - May 31, 2022 0
पुणे- राज्यातील सर्वात मोठ्या शिक्षक भरती परीक्षा घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे याला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. सुपे परीक्षा…

दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न निष्फळ, एसटी उलटली, सासवड जवळील घटना

Posted by - April 7, 2023 0
पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी आरटीओ कॉर्नर जवळ दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात राज्य परिवहन मंडळाची बस उलटली. या अपघातात एका मोटरसायकल स्वाराचा…

महत्वाची सूचना : पुण्यात पुढील दोन दिवस ‘या’ भागांत पाणीपुरवठा बंद

Posted by - November 29, 2022 0
पुणे : पुण्यात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महानगरपालिकेनं शहरातील पाच महत्त्वाच्या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला…

३४ गावातील अन्यायकारक कर कमी करा, सर्वपक्षीय कृती समितीचे आयुक्तांना साकडे

Posted by - May 11, 2022 0
पुणे- ग्रामपंचायतीपेक्षा अधिक रक्कमेच्या अन्यायकारक मिळकत कर तसेच पाणी टंचाई व इतर सुविधां अभावी ३४ गावांतील हजारो नागरिक त्रस्त झाले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *