शनिवार वाड्याजवळील दर्गा कोणाचा? प्रतापगडानंतर आता पुण्यात नवा वाद पेटण्याची शक्यता

423 0

पुणे : किल्ले प्रतापगडावर अफजलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवल्यानंतर या ठिकाणी आणखी तीन कबरी असल्याचे निदर्शनास आलं असून आता या कबरी नेमक्या कोणाच्या असा वाद सुरू असताना पुण्यामध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाड्याजवळील दर्गा आधी हटवून टाकण्यात यावा, अशी मागणी हिंदू महासंघाच्या वतीनं करण्यात आलीय. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी याबाबतीत आपली भूमिका मांडली असून हा दर्गा अनधिकृत असून याचा इतिहासाशी काहीही संबंध नसून ही दर्गा हटवण्यात यावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

शनिवार वाड्याच्या इतिहास हा कागदोपत्री उपलब्ध आहे. असा कोणताही दर्गा या आधी होता असं इतिहासात दिसत नाही. असा दावा हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनी केला आहे.

Share This News
error: Content is protected !!