अग्नीशामक दलाच्या जवानां सोबत दिवाळी साजरी; लोकसेवा फाऊंडेशनचा उपक्रम

243 0

पुणे : मुस्लीम समाजातील कार्यकर्ते तसेच लोकसेवा फाऊंडेशन यांच्या वतीने अग्नीशामक दलाच्या कोंढव्यातील २ केंद्रांमध्ये दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. लोकसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सलिम पटेकरी यांनी यासाठी पुढाकार घेतला.

जिवाची पर्वा न करता निस्वार्थीपणे अविरत सेवा देणाऱ्या , दिवाळीच्या दिवशीही आपल्या परीवारापासून दूर राहून नागरीकांच्या सुरक्षेकरीता झटणाऱ्या अग्नीशामक दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
पाडव्याच्या दिवशी कोंढवा येथे झालेल्या या कार्यक्रमात सिकंदर पठाण अध्यक्षस्थानी होते. चांद बलहटटी यांनी सूत्रसंचालन केले. समीर पठाण,असलम इसाक बागवान,आसमा खान , हाफिज शेख , गणेश भोईटे, अबुल कलाम
उपस्थित होते.

लोकसेवा फाऊंडेशन ही सामाजिक संस्था आहे. अपंग, विधवा व दारिद्रय रेषेखालील नागरीकांना वर्षभर शुगर ,डायबेटिस सारख्या आजाराकरीता मोफत औषध पुरवठा केला जातो. वर्षभर १५० कुटुंबाना रेशन किट तसेच गरीब विद्यार्थी यांना मोफत वही पुस्तके दिली जातात. दररोज ७० विद्यार्थ्यांना दररोज भोजन दिले जाते.

दिवाळी,ईद, ख्रिसमस, बुध्द जयंती,नानक जयंती हे सण या संस्थेतर्फे साजरे केले जातात.

Share This News
error: Content is protected !!