ठाकरे गटाला दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; ‘धगधगती मशाल’ पक्ष चिन्हाबाबत अखेर निर्णय

409 0

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे यांच्यासमोर गेल्या पाच महिन्यांपासून सातत्याने आव्हान उभे राहते आहे. पक्षातील मोठ्या बंडखोरीनंतर शिवसेना कोणाची आणि पक्षचिन्ह याबाबत तोडगा काढल्यानंतर पुन्हा एकदा नवीन पक्षाचिन्ह ‘धगधगती मशाल’ यावर देखील आक्षेप घेण्यात आला होता.

निवडणूक आयोगाने 11 ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या चिन्हांचे वाटप केले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे गटाला धगधगती मशाल हे चिन्ह देण्यात आले , तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळाले. पण निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर समता पक्षाने आक्षेप घेऊन अंधेरी पोट निवडणुकीत शिवसेनेला मशाल चिन्ह देऊ नये अशी मागणी केली होती. धगधगती मशाली अपक्ष चिन्हावर समता पक्षाने दावा ठोकला होता.

दरम्यान समता पक्षाचा हा दावा अयोग्य असल्याचा निर्वाळा आज उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला आता धगधगती मशाल या पक्ष चिन्हावर अंधेरी पोट निवडणूक लढता येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!