पुणे मनपा बांधकाम विभागाने बघ्याची भूमिका घेऊ नये; आनंदनगर झोपडपट्टीवासीयांना अधिकृत घरे मिळण्यासाठी ठोस भूमिका घेण्याची राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलची मागणी

462 0

पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातील आनंदनगर झोपडपट्टीतील रहिवाशांच्या न्याय हक्कासाठी संजय दामोदरे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन घेण्यात आले होते. जो पर्यंत तुम्हाला तुमच्या हक्काची घरे मिळत नाही तो पर्यंत आम्ही आपल्या या लढ्यात सोबत आहोत असे जाहीर आश्वासन त्यावेळी दिले होते.

त्याचाच एक पाठ पुरावा म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलचे पुणे शहर अध्यक्ष नितिन कदम यांनी पुणे शहर बांधकाम अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या बरोबर बैठक घेतली. त्यावर वरिष्ठांबरोबर याविषयी बैठक घेण्यात आली आहे व लवकरच आपल्या लोकांना न्याय मिळेल अशी ग्वाही बांधकाम अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली.

यावेळी संजय दामोदरे, श्वेता होनराव कामठे,दिनेश आण्णा खराडे, राहूल गुंड,अमोघ ढमाले, संग्राम होनराव आदी राष्ट्रवादी पदाधिकरी उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!