जगातील पहिल्या शाकाहारी मगरीचं निधन; ‘बाबिया’ची काय होती वैशिष्ट्ये ? जाणून घ्या VIDEO

261 0

केरळ : जगातील एकमेव शाकाहारी मगरीचे निधन झाले आहे. आता तुम्हाला हा प्रश्न नक्की पडला असेल मगर खरचं शाकाहारी असू शकते का ? तर होय दक्षिण भारतातील बाबिया नावाची मगर ही पूर्णपणे शाकाहारी होती. बबियाचं वास्तव्य कुठे होतं आणि ती कशी शकाहारी होती जाणून घेऊया आजच्या Top News Info मध्ये.

लाखो वर्षांपासून पृथ्वीवर राहणारी मगर मांसाहारी प्राणी आहे, पण भारतातील बबिया नावाची मगर पूर्णपणे शाकाहारी होती. दक्षिण भारतातील एका मंदिरात ही शाकाहारी मगर राहायची. 9 ऑक्टोबर रोजी बाबियाचा मृत्यू झाला आणि तिच्या मृत्यूनंतर तिची सगळीकडे चर्चा सुरू झाली.

उत्तर केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील अनंतपुरा नावाच्या एका छोट्याशा गावात श्री अनंत पद्मनाभ स्वामी मंदिराच्या तलावात बाबिया मगर राहायची.

सुमारे 75 वर्षांपासून बाबियाचे तलावात वास्तव्य होते. मंदिराचे पुजारी बाबियाला दिवसातून दोनदा प्रसाद खाऊ घालायचे. मंदिराचा प्रसाद खाऊन बाबिया जगायची. पुजार्‍याची आणि तिची एक अनोखी केमिस्ट्री होती. मंदिराच्या तलावात पुरेसे मासे होते, पण बाबियाने कधीही मासे खाल्ले नसल्याचा दावा मंदिरातील कर्मचारी करतात.मंदिरात येणारे भाविकही तिला तांदुळ आणि गुळ खायला द्यायचे.

बाबिया हे शाकाहारी अन्न मोठ्या आनंदाने खायची. विशेष म्हणजे, बाबियाने इतक्या वर्षात एकाही भाविकावर हल्ला केला नाही. भूक लागायची तेव्हा बाबिया तलावातून बाहेर यायची. पाण्यात राहून मगरीशी वैर करायचे नाही’ ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. याचे कारण म्हणजे, मगर आपल्या जबड्यात आलेल्या शिकारीला कधीही जिवंत जाऊ देत नाही. एखाद्या प्राणी मगरीच्या तावडीत सापडला आणि तो जिवंत परतला, असे क्विचतच पाहायला मिळते. पण, बाबीया पूर्णपणे शाकाहारी आणि माणसाळलेली होती.एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे ती मंदिरात फिरायची. कुणीही तिला घाबरत नसायचं. तिने कधीही कोणत्या व्यक्तीवर किंवा प्राण्यावर हल्ला केला नाही. असंही मंदिर प्रशासन सांगते.

अनंतपुरा मंदिर केरळमधील एकमेव मंदिर आहे, जे तलावात बनलं आहे. या मंदिराला पद्मनाभस्वामी मंदिर (तिरुवनंतपुरम) चं मूळस्थान मानलं जातं.

याच मंदिरात ‘अनंतपद्मनाभा’ची स्थापना झाल्याची मान्यता आहे. एका आख्यायिकेनुसार, एकदा श्री विलासमंगलाथु स्वामी (भगवान विष्णूचे भक्त) तपश्चर्या करत होते. या दरम्यान भगवान श्रीकृष्ण लहान मुलाच्या रूपात त्यांच्यासमोर प्रकट झाले. त्यांना त्रास देऊ लागले.मुलाच्या वागण्याने व्यथित होऊन त्यांनी त्याला धक्काबुक्की केली. त्यानंतर ते जवळच्या गुहेत बेपत्ता झाले. नंतर त्यांना कळले की, ते मूल दुसरे कोणी नसून भगवान श्रीकृष्णच होते.

तेव्हापासून असे मानले जाते की श्रीकृष्ण ज्या गुहेत गायब झाले होते, ती आजही तिथेच आहे. यासोबतच तिथे श्रीकृष्णाचाही वास आहे. तेव्हापासून मगर गुहेच्या आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करते.जर एखाद्या भक्ताला बाबिया मगर दिसली तर तो भाग्यवान समजला जायचा. बाबियाच्या जाण्याने मंदिर प्रशासन आणि भाविकांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!