दिवाळी स्पेशलमध्ये आज पाहूयात खमंग कुरकुरीत ‘शेव रेसिपी’

626 0

दिवाळीमध्ये गोड, तिखट फराळाचा आस्वाद घेताना त्यामध्ये शेव तर असायलाच हवी. या शेवेमध्ये देखील अनेकांचे आवडीचे प्रकार देखील असतात. जसे की जाड शेव, बारीक शेव, अगदी बारीक शेव… दिवाळीमध्ये तर हमखास शेव बनवली जातेच, पण अगदी वर्षभरामध्ये सुद्धा भाजी, पोहे उपमा यावर देखील शेव घालून बरेच जण खाणं पसंत करतात. चला तर मग आज पाहूयात अगदी सोप्या पद्धतीने बनवता येईल अशी शेव रेसिपी…

साहित्य : डाळीचे पीठ, मीठ, ओवा पूड, हिंग, तिखट, तळणीसाठी तेल

कृती : सर्वप्रथम डाळीचे पीठ बारीक चाळणीने चांगले चाळून घ्या. यामध्ये मीठ आणि तिखट चवीनुसार घालावे. एक चिमूट हिंग घालून यामध्ये एक मोठा चमचा कडक गरम केलेले तेलाचे मोहन घालावे. त्यानंतर हे पीठ घट्ट भिजवायचे आहे. या अंदाजाने गरजेनुसार पाणी घालून घट्ट गोळा तयार करून घ्यावा. एकीकडे आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये अर्धी कढईभर तेल घाला आणि ते तापू द्या.

See the source image

आता तुम्हाला ज्या आकाराची शेव बनवायची आहे त्या आकाराचा साचा सो-यामध्ये लावा. सोऱ्याला आत मधून तेल लावून घ्या आणि हा पिठाचा गोळा त्यामध्ये घालावा. आता गॅस मोठाच राहू द्या. कडकडीत तेलामध्येच शेव तळायची आहे. त्यासह सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकदा शेवेचा एक घाणा घालताना तो जमेल तितक्या वेगाने झटपट गोलाकार घालावा.

शेवेचा रंग हलका तांबूस होण्यास सुरुवात झाली की, लगेचच झाऱ्याने तो उलटा करून भाजून घ्या. दोन्हीही बाजूने खमंग तेलात तळल्यानंतर ही शेव व्यवस्थित तेलातून निथळून बाहेर काढून ठेवा. खमंग अशी कुरकुरीत शेव तयार आहे.

तुम्ही जर जाड साचा लावून शेवेचा घाणा घेणार असाल तर थर बारीक ठेवा. म्हणजे ती शेव आतपर्यंत व्यवस्थित तळली जाईल. जाड शेवेचा उपयोग शेव भाजी करण्यासाठी करता येऊ शकतो.

See the source image

सामान्यतः मध्यम असणारा साचा लावून दिवाळीसाठी सेवेचा घाणा घेऊ शकता.

Share This News

Related Post

Satara Dead

मध्यरात्री पुण्याहून रिटर्न येताना टिप्परने दिलेल्या धडकेत दोघा मित्रांचा दुर्दैवी मुत्यू

Posted by - May 17, 2023 0
सातारा : आळंदी – पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर काल रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात (accident) झाला. आळंदी – पंढरपूर राष्ट्रीय…

नोटा उधळून केलेल्या आंदोलनाची तात्काळ दखल, बीडीओ निलंबित

Posted by - April 1, 2023 0
शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून देण्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी लाच मागतात. या विरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा येथील अपक्ष सरपंच…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यासाठी साठी तयार करण्यात आलाय खास फेटा

Posted by - March 5, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी (ता. ६ ) पुणे दौर्‍यावर येत आहेत. त्यानिमित्त त्यांच्यासाठी खास फेटा तयार करण्यात आला आहे.…

जिल्हा प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे जयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत आणि उत्साहात संपन्न -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Posted by - January 2, 2023 0
पुणे : पेरणे येथील जयस्तंभ अभिवादन सोहळ्यात यावर्षी लाखो अनुयायी सहभागी झाले होते. नेहमीच्या तुलनेत अधिक प्रमाणात अनुयायी येऊनही जिल्हा…

CRIME NEWS : पिंपरी-चिंचवडमध्ये दत्तक मुलाचा छळ; आई-वडंलासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल

Posted by - November 14, 2022 0
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये दत्तक मुलाचा छळ करून त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत केल्याप्रकरणी आई-वडंलासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अन्वर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *