CRIME NEWS : अपहरण नाही, दीड वर्षाच्या चिमुकलीची बापानेच केली शेततळ्यात फेकून हत्या

660 0

जालना : आज सकाळी जालन्यातील निधोना शिवारातून एका दिड वर्षाच्या मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार चंदनझिरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र हे अपहरण नसून वडिलांनीच पोटच्या दीड वर्षाच्या मुलीची शेततळ्यात फेकून देऊन हत्या करत अपहरणाचा बनाव केल्याचा प्रकार पोलीस चौकशीत समोर आलाय.

पत्नीशी झालेल्या भांडणातून झोक्यात झोपलेल्या चिमुकलीला उचलून नेऊन तिची शेततळ्यात फेकून देऊन हत्या केल्याची कबुली मुलीच्या वडीलांनी दिली. जगन्नाथ डकले असं आरोपी वडिलांचं नाव असून श्रावणी डकले असं हत्या करण्यात आलेल्या चिमुकलीचं नाव आहे.

आई वडिलांच्या भांडणातूनच या मुलीची हत्या झाल्याचं समोर आल्यानं खळबळ उडालीय. पोलिसांनी निर्दयी बापाला ताब्यात घेतलं असून रात्री चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.

Share This News
error: Content is protected !!