पुणे : धानोरी येथे घरामधे लागलेल्या आगीत दोन सिलेंडर फुटल्याची घटना ; जखमी नाही

237 0

पुणे – आज सकाळी धानोरी, लक्ष्मीनगर, स.न. 81/82 या ठिकाणी एका घरामधे आग लागल्याची वर्दि दलाकडे मिळाली असता धानोरी अग्निशमन केंद्राचे एक अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना झाले.

https://fb.watch/fKz5HBOhX-/

घटनास्थळी पोहोचताच दलाच्या जवानांना सदर ठिकाणी पञ्याचे शेड असलेल्या एका घरामधे दोन घरगुती सिलेंडर फुटल्याचे निदर्शनास आले. जवानांनी इतर कुठे अजून सिलेंडर आहेत का याची खाञी करत तातडीने पाण्याचा मारा करत आग वेळेत विझवली. जवान वेळेवर पोहोचत आग वेळीच विझवल्याने इतरञ धोका निर्माण झाला नाही.

आगीमधे या घरातील सर्व गृहपयोगी वस्तू जळाल्या असून सध्या या घरात कोणी राहात नसल्याचे घरमालकाच्या सांगण्यावरून समजले. सदर ठिकाणी कोणीही जखमी वा जिवितहानी झाली नाही. आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.

या कामगिरीत धानोरी अग्निशमन केंद्र येथील वाहन चालक सचिन वाघमारे तसेच प्रभारी तांडेल दत्तात्रय सातव व फारयरमन संजय कार्ले, विलास राठोड, राहुल वडेकर यांनी सहभाग घेतला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!