GOURI KHAN

आर्यनच्या अटके प्रकरणी गौरी खान म्हणते ; “त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही”…! वाचा सविस्तर

322 0

मुंबई : करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या सातव्या सीजनमध्ये नुकतीच इंटेरियर डिझायनर आणि बॉलीवूडचा किंग शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिने हजेरी लावली होती. महीप कपूर आणि भावना पांडे यांच्यासोबत हा एपिसोड विशेष ठरला. तो गौरीच्या वैयक्तिक आयुष्यातील त्या खडतर घटने दरम्यानच्या आयुष्याचा…

See the source image

अर्थात बॉलिवूड कलाकारांचे आयुष्य हे कधीही वैयक्तिक राहत नाही. त्यांच्या चाहत्यांना त्यांचे बॉलीवूड स्टार्स कसे कपडे घालतात यापासून येणारा चित्रपट कोणता या प्रश्नांमधील प्रत्येक बारीक सारीक गोष्ट जाणून घ्यायची असते. मग अशावेळी किंग खानचा मुलगा आर्यन खान हा जेव्हा एका क्रूजवर ड्रग्स घेऊन जाताना पकडला गेला, एवढी मोठी घटना ही देशभरामध्ये चर्चिली जाणारच होती. या प्रकरणांमधून काही दिवसांची कोठडी भोगल्यानंतर पुराव्यान अभावी आर्यन खानची जामीनावर सुटका करण्यात आली.

See the source image

याच प्रकरणावर जेव्हा या टॉक शोमध्ये करणने गौरीला त्याविषयी विचारले, तेव्हा गौरी म्हणाली की, “होय एक कुटुंब म्हणून आम्ही यातून गेलो आहोत. मला वाटते एक आई म्हणून, पालक म्हणून आम्ही जे काही अनुभवलं आहे, त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. पण आज जिथे आम्ही एक कुटुंब म्हणून उभे आहोत. मी म्हणू शकतो की आम्ही चांगल्या ठिकाणी आहोत. या काळात आम्हाला सर्वांकडून प्रेम मिळाले. असे गौरी खानने सांगितले.”

See the source image

“त्यासह आमच्या सर्व मित्रांकडूनच नाही तर आम्हाला अनेकांचे संदेश मिळाले, त्यासाठी सगळ्यांचे मला आभार मानावे वाटतात. या काळात ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांची मी ऋणी आहे.” अशी भावना देखील गौरीने व्यक्त केली.

See the source image

Share This News
error: Content is protected !!