या कावळ्यांनो परत फिरारे…! नाशिकमध्ये पितृपक्षाचा मुहूर्त साधून रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बसत मनसेचे पिंडदान करून आंदोलन

430 0

नाशिक : महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांसह गावांमध्ये देखील रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये खराब रस्त्यांविषयी ओरड असतानाच नाशिकमध्ये मनसेने केलेल्या आंदोलनाची राज्यभर चर्चा सुरू आहे. त्याला कारण देखील तसेच आहे. मनसेने आपल्या खळखट्याक शैलीमध्ये पितृपक्षाच्या मुहूर्तावर रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बसून पिंडदान केले आहे.

अधिक वाचा : SIDHARTH SHIROLE : ठाकरे सरकारच्या वसुली धोरणामुळेच वेदान्ता-फॉक्सकॉनचा ‘जय महाराष्ट्र’ !

या कावळ्यांनो परत फिरा रे…! अशी बॅनरबाजी करून मनसेने मनपा प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांविषयी मनसेने आजपर्यंत अनेक वेळा निवेदन दिले. परंतु या निवेदनाला सातत्याने केराची टोपली दाखवण्यात आली. म्हणून आज मनसेने मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी पिंडदान करून अनोखे आंदोलन केले आहे.

अधिक वाचा : MAHARASHTRA POLITICS : शिंदे गट आणि मनसेच्या युती संदर्भात राज ठाकरेंचा मोठा निर्णय ; सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसे…

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide