ठळक बातम्याराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

BIG NEWS : ज्ञानव्यापी संदर्भात न्यायालयाचा मोठा निर्णय ; मुस्लिम बाजूची याचिका फेटाळली

ज्ञानवापी प्रकरण : वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानव्यापी प्रकरणातील याचिकेवर मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी होणार आहे.कोर्टाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली आणि हा खटला कायम ठेवता येण्याजोगा असल्याचे सांगितले. 

कोर्टाच्या आदेशावर भाष्य करताना ज्ञानवापी मशीद प्रकरणात हिंदू पक्षाची बाजू मांडणारे वकील विष्णू शंकर जैन यांनी आज सांगितले की, “कोर्टाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली आणि हा खटला कायम ठेवता येण्याजोगा असल्याचे सांगितले. या खटल्याची पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी आहे.”