“दाऊदच्या माणसांच्या कबरींचे सौंदर्यीकरण चालू आहे.” याकूब मेमनच्या कबर सजावटी वरून भाजपचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल ; पहा फोटो

422 0

मुंबई : 12 मार्च 1993 रोजी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नेतृत्वाखाली मुंबईमध्ये स्फोट घडवून आणण्यात आले होते. यामध्ये 205 नागरिकांचा दुर्दैवी अंत झाला. तर 700 हून अधिक नागरिक जखमी झाले. या घटनेतील आरोपी याकूब मेमन याच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली . याच घटनेतील आरोपी याकूब मेमन याच्या कबरीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

याकूब मेमनची कबर ही फुलांनी सजवण्यात आली आहे. दरम्यान एका गुन्हेगाराची कबर अशा पद्धतीने का सजवण्यात आली आहे ? असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी उपस्थित करून उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्येच याकूब मेमन याच्या कबरीचं मजार मध्ये रूपांतर करण्यात आल असल्याचा थेट आरोप देखील त्यांनी केला आहे.

या प्रकरणी भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की,”दाऊदच्या माणसांच्या कबरींचे सौंदर्यकरण करणे सुरू आहे. दाऊदचे प्रचारक म्हणून तुम्ही आता काम करा , त्यापेक्षा शिवसेनेने पुढचा कार्यक्रम हाच घोषित करावा पेंग्विन सेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी कबर बचाव हा कार्यक्रम जाहीर करावा अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

दरम्यान या प्रकरणी कब्रिस्तानचे अध्यक्ष शोएब खातीब यांनी मात्र एक खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शब्बे बारातच्या रात्रीचा हा फोटो असून हा जुना फोटो आहे. आणि खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. कबरीवर कोणतीही सजावट नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Share This News
error: Content is protected !!