मुंबई : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच मुंबई दौऱ्यावर होते. “राजकारणामध्ये धोका सहन करू नका,जे राजकारणात धोका देत असतात त्यांचं राजकारण यशस्वी होत नसतं. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशा शब्दात अमित शहा यांनी एकीकडे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान आंध्रप्रदेश मधील खासदाराचा सचिव असल्याचे सांगून एक तरुण अमित शहा यांच्या सोबत होता. मंत्रालय अधिकाऱ्यांना या व्यक्तीच्या हालचालींवर संशय आल्यामुळे त्यांनी ही माहिती मुंबई पोलिसांना दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. चौकशीनंतर हा तरुण धुळ्याचा असल्याचे उघड झाला आहे. हेमंत पवार असं या तरुणाचं नाव असून ही व्यक्ती नक्की अमित शहा यांच्या जवळ कशासाठी जात होती ,याचा तपास सध्या सुरू आहे.