पुणे : राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेच्या सदस्यता नोंदणीचा शुभारंभ VIDEO

310 0

पुणे : हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून, या भूमिकेचे पडसाद राज्यात उमटले होते राज ठाकरे यांचा नाशिक दौरा तोंडावर असतानाच त्यांच्या पाठीच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर दोन-तीन महिन्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना परवा मुंबईत मार्गदर्शन केले. त्यानंतर ते काल पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणीच्या आज शुभारंभ केला .

यावेळी कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक पक्षाला दोन ते अडीच वर्षानंतर सदस्य नोंदणी करावी लागते त्यानुसार ही नोंदणी होत असल्याचं राज ठाकरे हे म्हणाले. राज ठाकरे म्हणाले , यावेळेला जे सदस्य होणार आहेत त्या सदस्याला प्रत्येक आठवड्यात काहीतरी नवीन गोष्ट पक्षाकडून त्यांच्या मोबाईलवर जाणार आहे. त्यामध्ये माझे भाषणं असतील. महाराष्ट्रासंबंधी काही विषय असतील अशा गोष्टी त्यामध्ये असतील, या सदस्य नोंदणीमध्ये मी माझं पहिलं नाव नोंदवलं आहे. तुम्हीही मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी व्हावं.असं आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना यावेळी केलं.

यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, वसंत मोरे, बाबू वासगसकर मनसेच्या महिला पदाधिकारी व पुणे शहरातील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!