मुंबई :” महाराष्ट्रात , मुंबईमध्ये मोदींचं नाही , तर बाळासाहेबांचं नाव चालतं…!” असं वक्तव्य आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमांमध्ये केल आहे. मुंबईमधील इलेक्ट्रॉनिक्स वर्कर्स युनियनच्या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजपचा मुंबईवर डोळा आहे . पण भाजपला माहिती नाही की , महाराष्ट्रात… मुंबईमध्ये मोदींचं नाही तर बाळासाहेबांचे नाव चालतं . त्यासह कार्यक्रमांमध्ये कामगारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, तुम्ही मुंबईमधल्या लाखो घरांमध्ये जाऊन दिवे लावतात. त्यामुळे सध्या जो काही काळाबाजार सुरू आहे , त्याविषयी लोकांच्या घरात प्रकाश टाका. भाजपचे लोक सध्या आमदार, खासदार एवढेच काय तर शिवसेनेची बाळासाहेबांची स्वप्नही चोरत आहेत . हा पक्ष आहे की चोर बाजार ? अशी देखील टीका त्यांनी भाजपवर केली आहे.
यावेळी शिंदे गटावर देखील त्यांनी टीका करताना म्हटलं आहे की , एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर सध्या ” पन्नास खोके , एकदम ओके..!” अशी घोषणा व्हायरल होते आहे . लोक चिडवतायेत हे खोकं सरकार आहे . कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात आम्ही कोट्यावधींची कामे केली . कागदोपत्री असलेली काम प्रत्यक्षात देखील आणली . पण या सरकारने अनेक कामांना स्थगिती दिली . कारण त्यांचा जन्मच खोक्यातून झाला आहे . असा देखील टोला त्यांनी शिंदे सरकारवर लगावला आहे.