Crime

धक्कादायक : कुऱ्हाडीने वार करून दोन अज्ञात आरोपींनी पेट्रोल पंपावर घातला दरोडा ; थरकाप उडवणारा व्हिडिओ

604 0

पुणे : पुण्यातील न-र्हे भागामध्ये सोमवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी थेट पेट्रोल पंपावर दरोडा घातला. या दरोडेखोरांकडे एक कुऱ्हाड होती. या कुऱ्हाडीचाच धाक दाखवून त्यांनी पेट्रोल पंपावरील 20,400 रुपयांची रोकड लंपास केली आहे.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. हा व्हिडिओ पाहून एकच थरकाप उडतो. या आरोपीने येथील एका कर्मचाऱ्यावर कुऱ्हाडीच्या उलट्या बाजूने सपासप वार केले आहेत. यामध्ये जखमी कर्मचारी शांतकुमार पाटील यास गंभीर दुखापत झाली आहे . त्यासह अविनाश जमादार यास देखील खांद्यावर आणि हातावर मारल्यामुळे दुखापत झाली आहे. कुऱ्हाडीचा केवळ धाक दाखवण्याच्या उद्देशाने या आरोपींनी उलट्या बाजूने कुऱ्हाडीने मारहाण केल्याचे दिसत असून , 24 हजार चारशे रुपये रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेली आहे

घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक तपास सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सिंहगड पोलीस पथक करत आहे.

Share This News
error: Content is protected !!