अनेक महिलांना चेहऱ्यावर बारीक लव येत असते चेहऱ्याच्या काही भागावर न येणे हे अगदी सर्व सामान्य आहे त्यामुळे ती लव प्रत्येक वेळी कोणत्याही मार्गाने काढून टाकणे आवश्यकच आहे असे नाही अशावेळी ब्लिच करून या विरळ केसांचा रंग हलका करून त्वचा चमकदार आणि स्वच्छ दिसू शकते पण काही जणींना चेहऱ्यावर जास्त लव येते गालावर हनुवटीवर कपाळावर येणारी लव काढण्यासाठी अनेक महिला आणि युवती फेस वॅक्सिंगचा देखील उपयोग करतात पण ही ब्युटी ट्रीटमेंट वेदनादायी नक्कीच ठरते तर मग घरगुती असे काही फेसपॅक आणि उपाय आहेत ज्यामुळे ही लव हळूहळू कमी होण्यास नक्की मदत होईल केवळ यामध्ये सातत्य ठेवा .
- डाळीचे पीठ आणि आंबेहळद एकत्र करून आंघोळीच्या 15 ते 20 मिनिट आधी चेहऱ्यावर लावून ठेवा हा फेस पॅक बनवताना त्यामध्ये पाणीही घालून एकत्र करू शकता किंवा दूध घालून देखील एकत्र करू शकता त्यानंतर हा फेस पॅक चेहऱ्यावर चांगला वाळू द्या आणि चेहरा स्वच्छ धुताना हलक्या हाताने गोलाकार स्क्रबिंग करत रहावी यामुळे चेहऱ्यावरील लव कमी होण्यास अवश्य मदत होते
- मसूर डाळीचे पीठ आणि हळद लावल्याने देखील चेहऱ्यावरील लव कमी होण्यास अवश्य मदत होते . डाळीच्या पिठाप्रमाणेच हा फेसपॅक देखील दूध किंवा पाणी मिक्स करून चेहऱ्यावर वाळू द्या . ही प्रक्रिया तुम्ही संपूर्ण शरीरावर देखील करू शकता . अधिक वेळ नसल्यास आंघोळ करताना देखील साबणा ऐवजी या नैसर्गिक पॅकचा उपयोग लेप लावल्यासारखा केल्यास खूप चांगला परिणाम दिसून येऊ शकतो.
- दिवाळीमध्ये अभ्यंग स्नानाच्या वेळी आपण उटणे वापरतो . हे उटणे देखील लव कमी करण्यास त्यासह शरीरावरील रिमूव करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. योग्य प्रतीचे उटणे वापरल्यास खूप चांगला परिणाम दिसून येईल.