जळगावमध्ये सैराट : रक्षाबंधनाच्या 2 दिवसानंतर भावानेच दाबला बहिणीचा गळा ; प्रियकराची गोळ्या झाडून हत्या

413 0

जळगाव ( चोपडा ) : जळगाव मध्ये झालेल्या हत्याकांडानंतर एकच खळबळ उडाली आहे . सख्या भावानेच बहिणीचा गळा दाबून खून केला आहे . तर तिच्या प्रियकरावर गोळ्या झाडून त्याचे देखील हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव मधील चोपडा या गावांमध्ये घडला आहे.

Jalgaon Double Murder : दुहेरी हत्याकांडाने जळगाव हादरलं! मुलावर गोळी झाडली, मुलीचा गळा दाबला, चोपड्यात प्रेमप्रकरणातून हत्याकांड

मिळालेल्या माहितीनुसार , चोपडा गावामध्ये राहणाऱ्या त्या दोघा जणांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. एकमेकांसोबत राहण्यासाठी ते पळून जाणार असल्याची माहिती मुलीच्या भावाला मिळाली आणि मुलीच्या भावानेच हत्येचा कट रचला , आपल्या मित्रांच्या मदतीने त्या दोघांना गावापासून थोडे लांब नेले . सुनसान ठिकाणी नेऊन प्रथम मुलावर डोक्यात गोळी झाडली . त्यानंतर सख्ख्या बहिणीचा रुमालाने गळा दाबून तिची देखील हत्या केली .

धक्कादायक म्हणजे हत्या करणारा भाऊ हा अल्पवयीन आहे . या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे . घटनेची माहिती पोलिसांना मिळताच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत . याप्रकरणी मुलीचा भाऊ आणि एक साथीदार यांना ताब्यात घेण्यात आला असून दोन आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे . हत्या केल्यानंतर भाऊ स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि हत्येची माहिती दिली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!