टीईटी पेपर गैरव्यवहार प्रकरणी 7हजार 880 उमेदवारांना कायमची परीक्षा बंदी

269 0

पुणे:राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेतील झालेल्या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी होत चालली आहे. परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी ७ हजार ८८० उमेदवारांकडून प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपये घेण्यात आल्याची शक्यता आहे.

त्यामुळे या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असू शकते. या घोटळ्यातील दोषींना मोठा धक्का बसला आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्यातील दोषींना कधीच परीक्षा देता येणार नाही. टीईटीमध्ये गैरप्रकार केलेल्या ७ हजार ८८० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या सर्व उमेदवारांना आता बेकायदेशीर ठरवले आहे.

2017 साली झालेल्या टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत तब्बल ७८०० विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचं पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झाले होते. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेने बुधवारी जाहीर केली. त्यानुसार 7 हजार 880 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

संबंधित उमेदवारांची टीईटीची प्रमाणपत्रे रद्द करण्यासह त्यांना या पुढील टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरुपी प्रतिबंध घालण्यात आला आहे.​ तर बोगस पद्धतीने पात्र झालेल्या या 7880 विद्यार्थ्यांपैकी शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्यांचा शोध घेण्यात येणार आहे. शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या या शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. तशा सूचना शिक्षण संचालकांकडून देण्यात आल्या आहेत.

संबंधित उमेदवारांची टीईटीची प्रमाणपत्रे रद्द करण्यासह त्यांना या पुढील टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरुपी प्रतिबंध घालण्यात आला आहे.​ तर बोगस पद्धतीने पात्र झालेल्या या 7800  विद्यार्थ्यांपैकी शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्यांचा शोध घेण्यात येणार आहे. शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या या शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. तशा सूचना शिक्षण संचालकांकडून देण्यात आल्या आहेत.

आरोग्य भरती परीक्षेतील गैरप्रकारांचा पुणे पोलिसांकडून तपास करण्यात येत असताना त्या तपासातून टीईटी घोटाळा उघड झाला होता. यात परीक्षा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी, परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपनीचे संचालक आणि उमेदवारांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.

Share This News
error: Content is protected !!