Chandrakantada Patil : सिंहगड रस्ता सन सिटी ते कर्वेनगर पूल बांधणीच्या कामास गती द्या !

291 0

पुणे : कोथरूड, कर्वेनगर आणि सिंहगड रोडदरम्यानच्या राजाराम पूलावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सिंहगड रस्ता सन सिटी येथून ते कर्वेनगर पूल उभारण्यात येणार असून, या कामास गती देण्याची सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आयुक्त डॉ विक्रम कुमार यांना दिल्या.

पुणे महापालिकेच्या प्रस्तावित कर्वेनगर ते सनसिटी पूल या प्रकल्पाची भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकातदादा पाटील यांनी कर्वेनगर स्मशानभूमी येथे पाहाणी करून, आढावा घेतला. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, प्रकल्प अधिकारी श्रीनिवास बोनाला, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, राजाभाऊ बराटे, माजी नगरसेविका वृषाली चौधरी यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा : दहशतवादी संघटनांशी कनेक्शन ? कोल्हापुरातील हुपरीत ‘NIA’चा छापा ; दोघे ताब्यात…(VIDEO)

कोथरूड, कर्वेनगर आणि सिंहगड रोडदरम्यानची वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी पुणे महापालिकेच्या माध्यमातून सिंहगड रस्ता सन सिटी येथून ते कर्वेनगर पूल उभारण्यात येणार आहे. महापालिकेच्या अंदाज पत्रकातही यासाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र, अद्याप कामाची निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.

त्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकातदादा पाटील यांनी सदर प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेची पाहाणी करून, आढावा घेतला. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार हे देखील उपस्थित होते. यावेळी प्रस्तावित पुलामुळे सिंहगड रोड आणि कोथरूड आणि कर्वेनगर मधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने, प्रस्तावित पुलाची निविदा प्रक्रिया तातडीने राबवून, सदर प्रकल्पास गती देण्याची सूचना आ. पाटील यांनी आयुक्तांना केली.

अधिक वाचा : CRIME NEWS VIDEO : सांगली जिल्हा मध्यवर्ती पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारून खून प्रकरणातील आरोपी पसार

Share This News
error: Content is protected !!