पुणे-मुंबई-पुणे : प्रगती एक्स्प्रेस मार्गांवर २५ जुलैपासून धावणार

377 0

मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी पुणे-मुंबई-पुणे मार्गावर पुन्हा एकदा प्रगती एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाकाळात प्रगती एक्स्प्रेस बंद होती. प्रगती एक्स्प्रेस पुन्हा सुरू करताना तिला विस्टाडोम डबा (पारदर्शक काचेचा डबा) जोडण्यात येणार आहे.

ही गाडी २५ जुलैपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. मडगाव एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस पूर्वीपासूनच विस्टाडोम डब्यांसह धावत आहेत.

गाडी क्रमांक १२१२५ प्रगती एक्स्प्रेस सीएसएमटी येथून २५ जुलैपासून दुपारी ४.२५ वाजता सुटेल आणि पुणे येथे सायंकाळी ७.५० वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक १२१२६ पुणे येथून सकाळी ७.५० वाजता सुटेल आणि सकाळी ११.२५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ही एक्स्प्रेस दादर, ठाणे, पनवेल, कर्जत, लोणावळा, शिवाजी नगर येथे थांबेल.

या गाडीला ११ द्वितीय श्रेणीचे आसन डबे जोडण्यात आले आहेत. यातील पाच डबे आरक्षित आणि चार अनारक्षित, एक डबा पासधारकांसाठी आणि एक महिलासाठी राखीव असणार आहे. एका वातानुकूलित आसन डबाचाही समावेश आहे. एक जनरल द्वितीय श्रेणी डबाही जोडण्यात आला आहे. या गाडीचे आरक्षण २० जुलैपासून उपलब्ध आहे.

Share This News
error: Content is protected !!