महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेल्या राज्यातील विकासकामांना स्थगिती देऊ नये ; अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

221 0

मुंबई : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेऊन महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेल्या राज्यातील विकासकामांना स्थगिती देऊ नये अशी मागणी केली.

तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, पूरस्थितीने नुकसान झालेल्या शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना नुकसान भरपाई व मदतीचे तातडीने वितरण करण्यात यावे या मागण्यांचे निवेदनही यावेळी देण्यात आले.

यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार,जयंत पाटील, छगन भुजबळ,दिलीप वळसे पाटील,हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, दत्तात्रय भरणे उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!