धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळ पासून हंगामातील सर्वाधिक पावसाची नोंद

261 0

पुणे :शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी मध्ये 24 तासात हंगामातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. धरण साठ्यात 24 तासात एक पूर्णांक 14 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे.                                                                    चार दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे जोड नद्या आणि नाल्यांमधून मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी धरण साठ्यात येत असल्यामुळे पाणीसाठा झपाटाने वाढत आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. खडकवासल २२ मिमी, पानशेत ८५ मिमी,वरसगाव ८६ मिमी आणि टेमघरधरणाच्या पाणलोट क्षेत्रात १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा ६.९५ टीएमसी झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!