पुणे :”फिर इधर खडकी मे दिखना मत,नही तो तेरे को फिर से मारुंगा…!”अशी धमकी देऊन आरोपीने एका अल्पवयीन मुलाला जबर मारहाण केली आहे. याप्रकरणी खडकी पोलीस स्टेशनमध्ये चार युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, फिर्यादी हे वैयक्तिक कामासाठी खडकी परिसरामध्ये गेले असता,आरोपी आणि त्याचे तीन साथीदार घटनास्थळी थांबले होते. आरोपीने फिर्यादीकडे असलेल्या यमाहा गाडीवर चक्कर मारण्यासाठी गाडी मागितली,परंतु फिर्यादीने नकार दिल्याच्या रागातून या चार आरोपींनी लाथा बुक्क्यांनी या अल्पवयीन मुलाला मारहाण केली. त्यानंतर रॉडने आणि दगडाने मारहाण केल्यामुळे फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत.
अधिक वाचा : शिवसेना माजी आमदार महादेव बाबर यांच्यासह माजी नगरसेवक आणि ८ पोलिसांवर गुन्हा दाखल
त्यासह मदत करण्यासाठी फिर्यादीचा मित्र गेला असता त्यास देखील मारहाण करण्यात आली आहे.यासह फिर्यादीच्या यामाहा गाडीचे देखील दगड मारून नुकसान करण्यात आले. आणि “फिर इधर खडकी मे दिखाना मत,नही तो तेरे को फिर से मारुंगा…!”अशी धमकी देऊन तिथून निघून गेले आहेत.
अधिक वाचा : काँग्रेसचे नेते राज बब्बर यांना 2 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा;वाचा नेमके काय घडले…
याप्रकरणी खडकी पोलीस पथक अधिक तपास करत आहेत.